मोहोळ – तालुक्यातील तांबोळे या गावात मनोज बापू चौधरी यांच्या शेतातील वस्तीवर बुधवारी पहाटे ३ च्या दरम्यान अचानक बिबट्या सदृश्य प्राण्याने गायीवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली .या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे.
या विषयी मनोज बापू चौधरी यांनीच दिलेल्या माहिती नुसार ते बुधवारी पहाटे आवाजाने जागे झाले. त्यांना गायीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी लाईट लावली. त्यावेळी त्यांच्या अंगणात नुकतीच आणलेली एक जर्सी गाय तडफडत असल्याचे दिसून आले. त्या गाईचे कानाजवळ्चा भाग फाडल्याचे दिसून आले. *घाबरलेल्या चौधरी यांनी सकाळ झाल्यानंतर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर आणि संपर्क साधला.
वनमजूर रावसाहेब माने यांनी घटनास्थळी भेट घेतली . तसेच पशुधन पर्यवेक्षक ए.आर. वाळूजकर यांनी भेट दिली व वरिष्ठ अधिकारी यांना कळविले,मात्र हा बिबट्या आहे की अन्य प्राणी याची खात्री होऊ शकली नाही, तथापि .या घटनेमुळे या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे .*याबाबत चौधरी यांना विचारणा केली असता ही गाय एका आठवड्यापूर्वीच दीड लाख रुपयाला आणले त्यांनी सांगितलेले .आमचे नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले.






















