एक दिवस गावकर्यां सोबत कार्यक्रमास तळेगावात उत्तम प्रतिसाद…
उमरी (प्रतिनिधी) उमरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गांव म्हणून तालूक्यातील एक दिवस गावकऱ्यांसाठी हा उपक्रम तळेगाव ग्राम पंचायतीत राबविण्यात आला.
विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पासुन संपुर्ण मराठवाड्यात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उमरी पंचायत समितीचे अधिनस्त सर्व विभागांचे प्रमुख ह्या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी सुरेशराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अडबडवार यांची उपस्थिती होती.
ह्या कार्यक्रमात ग्राम पंचायत स्तरावरील विकास कामे, जनावरांचे गोठे, सिंचन विहीरी, घरकुल योजना, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण ह्यावर अधिकारी वर्गांनी मार्गदर्शन केले, जनतेच्या समस्यांचे निराकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी मोटरवार यांनी केले तर सुत्रसंचलन ग्राम विकास अधिकारी बैलकवाडजी यांनी केले. आभार माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी तळेगावातील आमदार राजेश पवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतुन झालेली विकास कामांची, अल्पसंख्यांक निधी, तांडावस्ती निधी, दलित वस्ती सुधार योजना निधी आणि १५ व्या वित्त आयोग निधीतुन झालेली विकास कामे बघून समाधान व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी, विस्तार अधिकारी पंचायत एस. आर. मोटरवार विस्तार अधिकारी राजेश्वर भुरे, पाणी पुरवठय़ाचे शाखा अभियंता महम्मद युसूफ, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक अशोक गायकवाड, सी. डी. पी. ओ. श्रीमती पाटील मॅडम, डॉ. मोनिका गजबे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती.