सोलापूर – ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था), सोलापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील २०२५-२६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग’ (NPTEL) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकाच सत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.
या यशामागे विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, विभागातील प्राध्यापिका प्रा. आर. डी. मैत्री आणि प्रा. एस. एस. मेटगार यांनी ही परीक्षा ‘सिल्व्हर एलिट ग्रेड’मध्ये उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. एनपीटीईएल समन्वयक प्रा. एम. एस. बिराजदार यांच्या यशस्वी नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश साध्य करणे शक्य झाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर ए. पाटील, सचिव श्री. शिवानंद एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले आणि प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
भविष्यातही अशा तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक उपक्रमांना महाविद्यालयाकडून अधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
*फोटो ओळी: यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत श्री. सिद्धेश्वर ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार व प्राध्यापक वर्ग.*


























