तभा फ्लॅश न्यूज/ मुदखेड : मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील श्रीदत्त मंदिर संस्थान सरेगाव मठाचे मठाधिपती महंत म्हणून सच्चिदानंदबन गुरु महंत यदुबन महाराज यांचा भव्य सत्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला आहे.
श्री श्री १०८ महंत स्वामी शांतीब्रह्म यदुबन गुरु गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीर्वादाने श्री पंचदशनाम जुना आखाडा वाराणसी (काशी) कडुन मठाधीपती संन्यासी महंत म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. दि.२० रोजी अभिष्टचिंतन सोहळा कीर्तन महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तनकार संत द भ प शहापुरी गुरु महंत रमणपुरी महाराज दत्त मठ निरंजन माहूर (विदर्भ) यांनी आपल्या मधुर संतवाणीतून दत्तभक्तांना परज्ञानाचा उपदेश केला.
ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची फुलाने तसेच रोषणाईने सजावट करण्यात आली होती. दत्त नावाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमला होता. भक्तिमय वातावरणात सरेगाव मठाचे नवनिर्वाचित मठाधिपती श्री सच्चिदानंदनबन गुरु यदुबन महंत महाराज यांची भव्य मिरवणुक व अभिष्टचिंतन करून औक्षण करण्यात आले. यानंतर दत्तभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचे महंत गोपीराज बाबा जामोदेकर तसेच अनेक संत , महंत, गायक, वादक, पंचकोशीतील सद्भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.