माढा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बु़धवार २८ जानेवारीला सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रातील राजकारणातील एक लखलखता तारा निघून पडला.
या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच सर्वत्र आपल्या दूरदृष्टीच्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश कार्याध्यक्षा विनंती कुलकर्णी,दिपक देशमुख,निलेश पाटील,तालुकाध्यक्षा वंदना कदम,उपसरपंच सुनील माळी ,रामभाऊ कदम,सुरेश पाटील,अनिल कदम, राजीव मोहिते, रानबा कदम, नितीन कदम, समाधान कदम, लहू बोराडे,महावीर कदम, अमोल कुलकर्णी, पालकर,आदी नागरिक उपस्थित होते.
























