सोलापूर – महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शहरस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी श्री. सुशिलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नेहरूनगर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती मा. श्री. यशवंत इंगळे साहेब व ग्रँडमास्टर युवराज गायकवाड सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मास्टर भास्कर देडे सर, अभिजीत गायकवाड सर, शस्त्रांग मार्शल आर्ट सोलापूर शहर अध्यक्ष संदीप गायकवाड, सचिव सम्राट गायकवाड, अनुराग देडे, नागेश कांबळे, विश्वजीत गायकवाड, सुमित पाटील, मोनिका गायकवाड तसेच पंच शर्वरी गुरव, साक्षी बेनूरे, श्रुती राठोड आणि विविध शाळांचे क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्पर्धा विनाअनुदानित खेळ प्रकारात १९ वर्षांखालील मुले व मुली यांच्यासाठी घेण्यात आली. यामध्ये संगमेश्वर कॉलेज, मेहता प्रशाला व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
मेहता प्रशालेच्या एकूण १६ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी :
आर्या शिंदे, वैष्णवी चव्हाण, शाल्मली जोशी, साक्षी बिदनुरे, श्रेया राठोड, श्रुती राठोड, संस्कृती जाधव, शर्वरी गुरव.
मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी :
सुजय हजारे, संभाजी ननवरे, श्रीराज घोलप, श्रेयश बहिरगोंडे, उज्ज्वल पैठणकर, तेजस डिकोळे,पालापुरे पंचप्पा, तोडकरी बसवेश्वर,
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, शिस्त व आत्मविश्वास वाढीस लागल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.





















