दहा ते पंधरा जणांनी मिळून वडिलांसह नऊ महिन्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना अक्कलकोट येथे घडली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सात जून 2024 रोजी अज्ञात कारणावरून राहत्या घरासमोर थांबले असता मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी वय वर्ष 35 व त्यांचा मुलगा उस्मान रजा मोहम्मद अली कुरेशी वय 9 महिने राहणार माणिक पेठ अक्कलकोट सोलापूर या दोघांना आयान अकबर कुरेशी व इतर दहा ते पंधरा जणांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या मारहाणीत मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी यांना छातीत गुडघ्याला व कमरेला मार लागला आहे तर त्यांच्या नऊ महिन्याच्या मुलाला डोळ्या पाशी व मानेला मार लागला आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखाना अक्कलकोट येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीच्या डायरीत झाली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...