तभा फ्लॅश न्यूज/ टेंभुर्णी : सोलापूर-पुणे महामार्गावरील वेणेगावजवळ येथे एक भीषण तिहेरी अपघात घडला. आडव्या आलेल्या बोलेरो गाडीला वाचवताना भरधाव ट्रेलरने साईडने जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरकडे निघालेला कंटेनर ट्रेलर वेणेगाव ब्रिजजवळ पोहोचला असता, पंढरपूर बाजूकडून अचानक बोलेरो गाडीसमोर आली. बोलेरोला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाने गाडी साईडला घेतली. मात्र त्या वेळी पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे ट्रेलरने नियंत्रण गमावले आणि दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले:
-
तानाजी तुकाराम खंडाळे (वय 70), रा. सापटने, ता. माढा – दुचाकी क्रमांक MH-12-EK-9776
-
सुखराम राधाकृष्ण जांगीड (वय 50), रा. सारंडा, ता. मेडतासिटी, जि. नागूर, राजस्थान – दुचाकी क्रमांक MH-45-AJ-0476
अपघात इतका भीषण होता की ट्रेलरच्या चाकाखाली येऊन आणि काही अंतर फरफटत गेल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी तातडीची कारवाई:
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अपघात पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरवडे टोल नाका व टेंभुर्णी येथून रुग्णवाहिका मागवून मृतदेह टेंभुर्णीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
हा अपघात महामार्गावरील अतिवेग आणि वाहतुकीतील अराजकतेकडे लक्ष वेधतो. प्रशासनाकडून वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांची नितांत आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.