सोलापूर : श्री भावनाऋषी व भद्रावती देवी यांच्या कल्याणोत्सवनिमित्त पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्यावतीने श्री मार्कंडेय मंदिरात महाआरती करण्यात आली.
रथसप्तमी दिवशी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्यावतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचे सुपुत्र श्री भावनाऋषी व भद्रावतीदेवी यांच्या कल्याणोत्सव निमित्त सिद्धेश्वर पेठ येथील श्री मार्कंडेय मंदिरातील हा कार्यक्रम घेण्यात आला.
या मंदिरातील भावनाऋषी व भद्रावतीदेवीची पूजा व महाआरती श्री मार्कंडेय महामुनींच्या आरतीनंतर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सर्व पदाधिकारी, ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी, युवक संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























