पांडूरंगाच्या चरणी अफाट जनसागर उसळला
संजय निकम
वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त आज विठुरायाच्या दर्शनासाठी प्रतिपंढरपूर नगरीत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तगणांचा अफाट जनसागर उसळला. पहिल्यांदाच प्रति पंढरपूर येथे लाखोच्या संख्येने अफाट जनसागर उसळल्याने भाविक – भक्तांमध्ये उत्सहाचे वातावरण होते. मोठ्या उत्साहाने महोत्सव भरल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांचा आनंद पांडुरंगाच्या दर्शनाने द्विगुणित झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून नावलौकिक असलेली ही दुसरी पंढरी ज्यांचे मोठ्या पंढरपूरला जाणे होत नाही अशी वारकरी मंडळी, भक्तमंडळी, आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त लाखोच्या संख्येने प्रती पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत असतात आज आषाढी एकादशी असल्याने सकाळपासूनच वारकऱ्यांच्या दिंड्या, तसेच डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन विठुरायाचा नामांचा गजर करत दर्शनासाठी येणारे लाखो भाविक भक्त प्रती पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने दाखल होत असल्याने विठू रायाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर नगरी भक्ती रसाच्या अफाट जनसागराने आणि विठुरायाच्या नामघोषाने नीनांदुन निघाली आहे.
अफाट भक्तगण आणि चोख पोलीस बंदोबस्त
दरवर्षी पेक्षा यावर्षी पांडूरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. तरीही पोलीस उपायुक्त नितीन बगाटे , एम आय डीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे व त्यांची संपूर्ण टीम डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत.
यावेळी विविध संस्था , संघटना , पुढारी , नेते यांनी ठिकठिकाणी मंडप उभारून येणाऱ्या भक्तांसाठी फराळाची , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच स्वयंसेवक जीव ओतून काम करत असल्याचे दिसून आले. मंदिर व्यवस्थापन , पदाधिकाऱ्यांसह पोनि जयंत राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, बाळासाहेब आंधळे , पोलीस कर्मचारी सय्यद चांद, योगेश शेळके, विनोद नितनवरे, विलास वैष्णव , विशाल पाटील , राहुल खरात , विशाल पाटील, सुरेश भिसे , नितीन इनामे, सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज शिंदे , धिरज काबलीया शेख नवाब , केशव चौथे विशाल थोटे , कृष्णा खैरनार ‘ रोहित चिंधाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी ३२ पोलीस कर्मचारी ३०० आणि होमगार्ड १५० असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.