सोलापूर – १८ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथे श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस व वेदिक मॅथ स्पर्धेत दुधनी येथील “आप्पाजी” अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी प्राध्यापिका गीता मठपती यांनी विद्यार्थ्यांना पुणे येथे नेऊन मार्गदर्शन केले. स्पर्धेत दक्ष जानकर, रुद्रा जानकर, संचित मानकर, नंदिनी दंडवते, विनायक धोड्डामनी, सिंचना मुडुलकर, सरस्वती कलाल, धानेश्वरी स्वामी, शिवलिंग मठपती व आदिल नदाफ या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळवले.
या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशातील विविध राज्यांतून सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून *आदिल नदाफ* याने उत्कृष्ट कामगिरी करत “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन” हा मानाचा किताब पटकावला. त्याबद्दल त्याला सायकल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका गीता मठपती यांचे पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.























