लोहा
कलंबर सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जनसंवाद बैठक ७ जुलै रोजी रायवाडी येथील नंदी देवस्थान परिसरात आयोजीत करुन प्रमुख पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीत जो कोणी कंबर कसुन उमेदवार येईल त्या उमेदवाराच्या स्वप्नचा चक्काचूर करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागेली तरी चालेल पण मी आमदार होणार हे सत्य आहे. मी आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे.
कार्येकरत्यानी ढगमग न करता जोमाने कामाला लागावे, विजय आपलाच आहे. महाविकास आघाडीतून उमेदवारी आपनालाच मिळणार आहे. नव्यानेच भावी आमदार म्हणुन वावरणाऱ्याला झंनझनीत इशारा आहे. आमदार नावाचे भुषण अलंकार वापरणाऱ भावी आमदाराची हवा गुल करुन त्यांना गारदच केले.त्यामुळे भावी आमदाराचे कार्येकरते बुचकळ्यात पडले आहेत आणखी काही कार्येकर्ते चांगला रस्ता धरण्याच्या तयारीत आहेत.
आशाताई शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत रायवाडी येथील नंदीचे दर्शन घेतले .नंदिकेश्वर मंदिर कमिटी रायवाडीच्या वतीने सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या जनसंवाद बैठक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे ,शेख शेरूभाई, तालुका समन्वय समितीचे सदस्य सिद्धू पाटील वडजे, तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, दुलेखान पठाण, उपसरपंच अशोक गीते, कलंबर चे उपसरपंच माधव मोकले,कृउबा संचालक माणिकराव पाटील वाकडे, जोशीसांगीचे सरपंच विक्रम पाटील मोरे, प्रदीप हुंबाड, माजी सरपंच बबरू पाटील ताटे, रामेश्वर पाटील जाधव, डि.के. कांबळे कलंबरकर, शेकापसह इतर पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने या जनसंवाद बैठकीस उपस्थित होते.