कुर्डूवाडी – २६ डिसेंबर २०२५ रोजी आश्रम शाळा, केवड येथे आयोजित ५३व्या विज्ञान प्रदर्शनात उच्च माध्यमिक विभागातील (इ. ९वी ते १२वी) विद्यार्थ्यांचा ‘फायर फायटिंग रोबोट’ हा प्रयोग तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाचे उद्घाटन माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता दहावीतील कु. अभिनव भगवंत साळवे आणि कु. हर्षवर्धन बाळासाहेब खुणे या विद्यार्थ्यांनी या यशस्वी प्रयोगात भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक अध्ये सर, तंत्रज्ञ डिकोळे आणि मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे आणि प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


























