सोलापूर : ॲड व्ही. एस. आळंगे यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे जेष्ठ वकील हे सर्वोच पुरस्कार भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून देण्यात आला. भारतातील पहिल्या ॲडव्होकेट अकादमी चे उदघाटन व सिनियर ॲडव्होकेट पुरस्कार मुंबई येथील तळोजा येथे शनिवार ३१ जानेवारी रोजी पार पडला.
बार कौन्सिलचा सातत्यपूर्ण प्रयत्न न्यायालये व बार यांचे बळकटीकरण करण्याचा आहे, विशेषतः तालुका व जिल्हा स्तरावरील न्यायालयांमध्ये कार्यरत असलेल्या वकिलांसाठी. अधिवक्ता अधिनियमातही अपवादात्मक ज्ञान, क्षमता व प्रतिष्ठा असलेल्या वकिलांना मान्यता देण्याची तरतूद आहे. या भावनेतून, ट्रायल कोर्टमध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी वकिलांना “ज्येष्ठ वकील” हा सन्मान प्रदान करण्याचा निर्णय बार कौन्सिलने घेतला आहे.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या ॲडव्होकेट अकॅडेमिचे उदघाटन केले व भाषनावेळी जेष्ठ वकिलांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास सोलापुरातील जेष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे, ॲड. एल एन मारडकर, सिद्धेश्वर देवस्थान चे सदस्य ॲड आर एस पाटील, ॲड. आर. एस. आळंगे, ॲड. अशोक जालादी, ॲड किरण कनाळे, ॲड अजित आळंगे , ॲड शुभम माने, ॲड सागर स्वामी, ॲड प्रकाश सोनार व इतर वकील यांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमास भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सि चंद्रशेखर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, बार कौन्सिल चे अध्यक्ष हर्षद निंबाळकर व इतर जजेस व वकील वर्ग उपस्थित होते.

























