जाफ्राबाद / जालना – अगोदरच दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता चोरट्यांचे संकट ओढावले आहे. तालुक्यातील पापळ शिवारात घडलेल्या घटनेत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील काढणीला आलेला कापूस वेचून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि मौजे पापळ शिवारातील शेतकरी अंबादास लिंबाजी मोरे यांची पापळ शिवारातील गट क्र २९. मध्ये शेती असुन दि.११.१२.२०२५ रोजी शेतात जाऊन बघीतल असता शेतात कापूस होता .पण दुसर्या दिवशी वार शुक्रवारी सकाळी शेतकरी अंबादास मोरे शेतात गेले असता संपूर्ण शेत ओसाड दिसले. झाडांवरचा कापूस चोरट्यांनी वेचून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शोध घेतला, परंतु चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही.
या घटनेमुळे शेतकरी मोरे यांना जवळपास २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आधीच दुष्काळ, अतिवृष्टी आणि कापसाच्या भावातील चढउतारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता या चोरीने आणखी फटका बसला आहे कापूस चोरी विषयी . टेंभुर्णी पोलिसात अर्ज देऊन कारवाई करावी असी मांगणी शेतकऱ्यांन केली.
गावकऱ्यांनी सांगितले की, परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींच्या हालचाली दिसून येत होत्या. मात्र त्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. आता या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





















