सोलापूर – शालेय शहर खो-खो स्पर्धेत अहिल्याबाई कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षाखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक संपादला.
वसुंधरा कॉलेज जुळे सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली. संघास क्रीडाशिक्षक रमेश हेगडे, प्रा.धनाजी धेंडे, यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूं व प्रशिक्षकांचे संस्थेचे सचिव हाजी बंदेनवाज शेख,प्राचार्य इस्माईल शेख यांनी अभिनंदन केले.
संघ : सोहेल गौर (कर्णधार), फरमान शेख, अनिश गुजले, नेल्सन पीटर, कैलास वाघमारे, फरान शेख, फुरकान शेख, अबुबुकार शेख, सोहेल बागवान, ओंकार सूर्यवंशी, विशाल गायकवाड, व्यंकटेश खेवजी,समर्थ कळमंडे.