अक्कलकोट – सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर 2026 ते 2030 पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत अक्कलकोट तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांची सभा अक्कलकोट येतील अजिंक्यराणा फंक्शन हॉल येथे संपन्न होऊन, नूतन तालुका कार्यकारणी व तालुक्यातील एक जिल्हा प्रतिनिधी यांच्या निवडी जाहीर करण्यात आले.
तालुका अध्यक्ष म्हणून प्रभाकर बंदी छोडे, उपाध्यक्ष शिवराज किलजे,सचिव सिद्धया स्वामी ,विद्यासचिव सोनाली सुतार, कोषाध्यक्ष अशोक कलशेट्टी, प्रसिद्धीप्रमुख शंकर व्हनमाने ,क्रीडा विभाग प्रमुख अनिल देशमुख ,कार्यकारणी सदस्य म्हणून महेश चाणकोटे महादेव माने अशोक मुजावर सिद्धाराम हडपद ,मलकप्पा भरमशेट्टी ,व्यंकटेश बोकडे ,यांची निवडी जाहीर करण्यात आले, या प्रसंगी सल्लागार म्हणून कल्याणी देशेट्टी ,नंदाजी कदम ,आदींची निवड करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी निवडी जाहीर केले ,संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम लवटे उपस्थित होते.
यावेळी राज्याध्यक्ष तानाजी माने रंगसिद्ध दसाडे, सिद्राम खट्टे , रेवणसिद्ध रोडगीकर हे नियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते ,कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना श्रीशैल पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष माने होते ,या प्रसंगी तालुक्यातून प्राचार्य ,मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसय्या हिरेमठ ,भोसले मॅडम ,बाबर मॅडम, चंद्रकांत पुजारी ,कल्याणी देशेट्टी ,सिद्धेश्वर धर्मसाले,अनिल पाटील, महादेव सोनकर ,संजय जानराव, आदींनी परिश्रम घेतले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धया स्वामी यांनी केले ,तर सर्व उपस्थिताचे आभार प्राचार्य शंकर व्हनमाने यांनी मानले,


























