एम एच २९ हेलपिंग हॅन्डस कडून सतर्कतेचा इशारा!
बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांचा संचार
माहूर, दि.२० जुलै

: पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात विविध सरपटणाऱ्या प्राण्यांसह धोकादायक सापांचा संचार वाढतो.पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा हा प्रजनन काळ असतो.त्याचबरोबर सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरते त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षीत जागेच्या शोधात साप जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती,शेती पिकात वावरत असतात. अशात शेतात पिकांची पहाणी करतांना आणि कामे करतांना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी आपल्या विषारी सालापासून जिवाची खबरदारी बाळगणे गरजेचे असून,जून ते ऑगस्ट दरम्यान शेतकरी व शेतमजुरांनी सर्वाधिक खबरदारी व सतर्कता बाळगावी असे आवाहन एम एच २९ हेलपिंग हॅन्डस ॲडव्हेंचर ॲण्ड नेचर क्लब नांदेड जिल्हा चे अध्यक्ष मोहन मुर्ती यांनी केले आहे.
मागील आठवडाभरापासुन जिल्हात सर्वत्र पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशीवारात संचार वाढला आहे सद्यः स्थितीत पिके चांगली वाढली आहेत शेतकरी पीकांत फवारणी करण्यासह निंदन , खुरपणाची कामे करीत आहे एखाद्यावेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन एम एच 29 हेलपिंग हॅन्डस ॲडवेंचर ॲण्ड नेचर क्लब,नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहन मुर्खे यांच्याकडून करण्यात येत आहे आणि कुठेही साप आढळून आल्यास 9922363538 या नंबर वर संपर्क साधावा..
सर्पदंश टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी
🟥 शेतात फिरतांना फवारणी करतांना जाड बुटांचा वापर करावा.
🟥 शक्यतो यंत्राणेच फवारणी करावी.
🟥 पिकात फिरतांना जाड काठी, बुट जमीनीवर आदळत जावे.
🟥 हातांने पिकांची पहाणी करू नये,पिकांत खाली वाकु नये.
🟥 साप दिसल्यास त्याला न डीवचता सर्पमित्रांना कळवावे,.
🟥 जून ते ऑगस्टच्या दरम्यान सर्वधिक सतर्कता बाळगावी.
देशभरात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी माहूर तालुक्यात फक्त ०४ विषारी साप आढळतात.त्यामधे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या सापांचा समावेश आहे.. “साप हा शेतकऱ्यांचा शत्रु नसून, मित्र आहे.त्यांना मारण्यापेक्षा वाचवण्यात खूप आनंद आहे!”