अक्कलकोट – शहरातील नाल्यावरील ५५ अतिक्रमण काढली . मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहिम चालु आहे . कारंजा चौक , बसस्थानक परिसर ‘ समाधी मठ परिसरातील अतिक्रमण काढणार आहोत . एप्रिल अखेर टप्प्या टप्प्याने शहरातील सर्व अतिक्रमणे काढणार आहोत .मा उच्च्य न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील काही अतिक्रमण काढण्याला स्थगिती आहे . २६ मार्च २०२६ नंतर शहरातील काही मोठे अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानंतर वटवृक्ष मंदिर परिसरातील काही मोठे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अतिक्रमण ‘ रहदारीस अडथळा असलेली अतिक्रमण नागरिकांनी व्यापाऱ्यानी स्वतःहुन अतिक्रमण काढावे नुकसान टाळावे असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे . पोलीस निरिक्षक दिपक भिताडे यांच्या नेतृवात तगडा पोलीस बंदोबस्त नपाचे कर्मचारी फौज फाट्यासह मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली जात आहे . याचा धसका अनेकांना बसला आहे . अतिक्रमण काढताना सुचना दया काढण्यासाठी वेळही दया नुकसान टाळा अशी मागणी व्यापारी वर्गानी व्यक्त केली आहे .
दरम्यान शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेचे स्वागत समाज सेवक वसंत देडे यांनी केले आहे शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी वसंत देडे यांनी केली आहे मुख्याधिकारी डाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिपक भिताडे यांच्या कडक पोलीस बंदोबस्ता मध्ये ही मोहिम निपक्ष राबवित असल्या बद्दल वसंत देडे यांनी कौतुक केले आहे .

























