महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या अमरावती विभागीय कार्यालयाने पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या ११ बसेस भंगार जाहीर करून त्यांच्या फेऱ्या बंद केलेल्या आहेत. आता या भंगार बसेस रस्त्यावर धावणार नाहीत, अशी माहिती विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. पुढील ब दिवसात आणखी काही गाड्या भंगारात काढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जाणार
२३ डिसेंबरपर्यंत ज्या एसटी बसेसला पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, अश्या बसेसची यादी करून त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक बस फेऱ्यासुद्धा कमी कराव्या लागल्या आहेत. बसेसची कमतरता पूर्ण करण्यासाठी अमरावती विभागाने १७१ नवीन बसची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त २० नवीन बस अमरावती विभागाला मिळाल्या आहेत.प्रवाशांची वाढती संख्या बघता, त्या बस पुरेशा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकामध्ये बसची वाट पहावी लागते. उर्वरित बसेसची मागणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.