पंचवीस वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नसून पोलीस शोध घेत आहेत. लोकेश करणसिंग सोनार (वय २५, रा. मोडनिंब, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना रविवार, १० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रविवारी दुपारी मोडनिंब रेल्वे स्टेशनच्या ५० मीटर पुढे मैदानातील झाडाला दोरीच्या सहायाने लोकेशने गळफास घेतला. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना समजताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यास खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात काका दीपक सोनार याने सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉ. विजय सुरवसे यांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...