माळशिरस – महिला व बाल विकास विभागाकडील राजपत्रित अधिकारी संघटना व त्या विभागातील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या सहयोगी संघटना यांचे त्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आंदोलन सुरु.केले असून माळशिरस बीटच्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बहिष्कार टाकला आहे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन शक्ती, सामर्थ्य, संबल, मिशन वात्सल्य अशा अत्यंत महत्त्वपूर्ण व महिला व बालकांशी संबंधित असलेल्या सेवांमध्ये उत्कृष्ट प्रकारची कामगिरी सातत्याने करणाऱ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणींची वेळेत दखल घेणे आवश्यक आहे.
महिला बाल विकास विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात घेता अनेक मागण्या बऱ्याच मोठ्या कालावधीपासून प्रलंबित आहे.याची दखल घ्यावी अशी मागणी माळशिरस तालुक्यातील . महिला व बाल विकास विभागाकडील राजपत्रित अधिकारी संघटना व त्या विभागातील इतर अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.त्यास अनुसरून माळशिरस बीटच्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बहिष्कार टाकला आहे.

















