*विठ्ठलनामाची शाळा भरली…*
*अंकुरम विद्या मंदिर शाळेने आयोजित केला आषाढ वारी पालखी सोहळा*
मंगळवार दिनांक 16, जुलै, 2024 रोजी अंकुरम विद्या मंदिर, वाशी शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
शिवाजी ज्ञानविहर शिक्षण मंडळ चे अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद पवार, उपाध्यक्ष केशर पवार, संचालक विनोद मान्यवर, प्राचार्य संतोष चाको यांचे सह सर्व शिक्षक- शिक्षिका यांचे हस्ते पालखीपूजन व विठ्ठलाची आरती झाली.
या वेळी विद्यार्थ्याना संत परंपरा, संताचे कार्य वारी – पालखी – दिंडी या संकल्पना समजून सांगितल्या. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा निघून वाशी येथील प्रति- पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आणि वासकर महाराज (आबा) यांच्या तपोवन येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिर येथे समारोप केला.
चिमुकल्यांनी
साडे चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या.



















