अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते न्यासाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे श्री स्वामी कार्य हे राज्य, देश, परदेशात पोहचलेले असून, दर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट नगरीत येणारे भक्त गण अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतात.
अनेक स्वामी भक्त व न्यासाच्या कार्यात नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे असे राज्यात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहेत. या मध्ये पुणे महापालिकेच्या एकूण सदस्य पैकी १४५ हून अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी नुकतेच पुणे येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केले. यामध्ये विजयश्री मिळाल्याबद्दल नूतन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा सन्मान न्यासाच्या वतीने श्रींची, छत्रपती शिवाजी महाराजांची विशेष कलाकृती प्रतिमा, कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवेदिता एकबोटे, भरत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, पुणे, संदीप खर्डेकर आदिजन बहुसंख्येने उपस्थित होते.

















