वेळापूर – लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी साखर कारखान्याचे चीफ केमिस्ट विठ्ठल आडत , सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुवर्णा आडत, जेष्ठ नागरिक नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी सावंत , शिवगंगा दूध डेअरीचे चेअरमन भागवत गायकवाड, लोकविकास शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत नवले, तसेच लोकविकास ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अमोल पांढरे ,लोकविकास इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक अजित बनकर लोकविकास मराठी मिडीयमचे मुख्याध्यापक सुनील पताळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
विद्यार्थानी वैयक्तीक स्पर्धेमध्ये तसेच सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच नरेंद्र कुलकर्णी व विठ्ठल आडत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी वैशाली आदलिंगे, ज्योती गाडेकर, प्रियंका अनंतकवळस, उषा राऊत, राणी शिंदे, वैभव जगताप, आदी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कुदळे व आभार प्रदर्शन कोमल चव्हाण यांनी मानले.























