मोहोळ – जिल्हा परिषदेसाठी उभे असलेल्या उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या ४७ जणांनी अर्ज माघार घेतले आहेत . त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी २५ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत .
अर्जमाघारी घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये पोखरापूर – (जि प ) शंकरराव वाघमारे आणि विजयकुमार चौधरी,यशवंत नरुटे, नरखेड -राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि भाजपचे – सोमेश क्षीरसागर, पेनुर जि.प – सुनील चव्हाण आणि माऊली भगरे , आष्टी जि प बाळासाहेब पाटील, जयराम गुंड आणि मदन पाटील,आदी मान्यवरांचा समावेश आहे तर पंचायत समिती घोडेश्वर- अमरनाथ सरवळे संजय विभुते, ,कामती बुद्रुक- दिपाली कोरे, स. वरवडे -समाधान पाटील .आणि मार्तंड काळे सुरेश शिवपुजे, आदींचा समावेश आहे .
तत्पूर्वी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावे यासाठी पक्षश्रेष्ठींना अक्षरशः त्यांची मिनतवारी करण्याची पाळी आली .खास करून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकराराव वाघमारे आणि माजी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांचा अर्ज काढण्यासाठीनवे जुने कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र दिसून आले .जुन्या कार्यकर्त्यांनी मार्केट कमिटी मध्ये माजी आमदार यशवंत माने यांच्याशी जोरदार शब्दात चर्चा केली .
यावेळी बोलताना माजी आमदार यशवंत माने यांनी आपण भाजपमध्ये नवीन आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत शंकरराव वाघमारे यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे सांगितले .तथापि आपण पक्षावर नाराज नसून कुठलाही शब्द न घेता पक्ष शिस्ती साठी आपण स्वखुशीने अर्ज माघारी घेत आहे अशी प्रतिक्रिया शंकरराव वाघमारे यांनी यावेळी दिली .तथापि त्यांच्या अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर तालुक्यातील भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून कार्यकर्त्यांची नाराजी कशी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कचेरीला आलेले जत्रेचे स्वरूप


























