लोहा – तालुक्यातील सावरगाव (न) येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व ,२४ तासाचा प्रशासक विस्तार अधिकारी यांच्या गैरव्यवहार प्रकरणीची चौकशी करण्यासाठी शासकीय चौकशी पथकाची नियुक्ती केली आहे.
सावरगाव येथे मागासवर्गीय महिला प्रशासक संरपंच अनुसया बालाजी भावे यांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी नांदेड यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करावी असे निवेदन देऊन उपोषण करण्याचा असा इशारा दिला होता.
हि बातमी दै.तरुण भारत वर्तमानपञामध्ये गैरव्यवहाराचा भांडाफोड केला याची दखल घेऊन तालुका स्तरावरील चौकशी समितीची नियुक्ती केली आहे यामध्ये सहय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडेबाई , शिवाजी राठोड उपअभियंता जि.प.लोहा, देशपांडे विस्तार अधिकारी प.स.लोहा या पथकाची नियुक्ती केली आहे.
लोह तालुक्यातील सावरगाव (न.) येथे अनुसूचित जाती महिला सरपंच पद राखीव आसल्याने. ग्रामसेवकाने सरपंचाला अंधारात ठेऊन गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या संगनमताने फक्त याच गावची डी.एस.सी.चालु करुन निधी उचलला.
संपूर्ण महाराष्ट्रात (डी.एस.सी) डिजिटल पेमेट इलेक्ट्रॉनिक मशिन बंद असताना सावरगाव (न) ग्राम पंचायतची एकच मशिन चालू करुन काम न करता विस्तार अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक यानी प्रशासक महिला सरपंचाल अंधारात ठेवून रक्कम उचलून हाडप करण्याचा प्रयत्न केला पण संरपंच अनुसया बालाजी भावे यांनी निवेदन देऊन चौकशी मागणी केली.या निवेदनाची दखल घेऊन दै.तरुण भारत ने वर्तमानपत्राने गैरव्यवहाराचा भांडाफोड केला अखेर शासनाने चौकशी पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिली अशी माहिती चौकशी पथकातील जबाबदारी अधिकाऱ्याने माहिती दिली.



























