सांगोला – तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानला गुंफण अकादमी कराड, सातारा यांच्या वतीने गुंफण सामाजिक पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. गुंफण अकादमीच्या वतीने अध्यक्ष डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी गुंफण पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्कार विजेत्यांमध्ये निवृत्त पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, शाहीर रंगराव पाटील, ओमप्रकाश तथा काका कोयटे, पुण्यातील काका हलवाईचे युवराज गाडवे, संदेशकुमार नवले यांचा समावेश आहे.
या पुरस्काराचे वितरण दि.१५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था कोथरूड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

























