सांगोला – लोणविरे, ता.सांगोला येथील व सध्या श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली येथील इतिहास विभागात कार्यरत असणारे प्रो.डॉ.संजयकुमार नामदेव गायकवाड यांची महाराष्ट्र फेडरेशन ऑफ यूनिवर्सिटी एंड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन, मुंबईच्या एक्झिक्युटिव कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
डॉ.गायकवाड यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठ टीचर्स युनियनच्या विविध आंदोलने आणि कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कांती वामजा, सचिव रमणीक दावडा, डॉ.महेश शाह, अरुण शेठ, रितेश शेठ, प्र.प्राचार्य डॉ.एल.आर.पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


























