सोलापूर : कला संचलनालयाद्वारे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.
श्रद्धा संतोष जाधव,श्रद्धा श्रीशैल तोडकरी,सिद्धी संजीव गजेली या विद्यार्थिनींनी एलिमेंटरी परीक्षेत अ श्रेणी प्राप्त केली.
तसेच 14 विद्यार्थ्यांनी ब श्रेणी व13 विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली.इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेस 47विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी भावना नंदकुमार वड्डेपल्ली,समीक्षा विनायक सुतार,
गायत्री श्रीनिवास करदास या तीन विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली. प्रशालेतील 11 विद्यार्थ्यांनी ब श्रेणी व 33 विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली आहे.रेखाकला ग्रेड परीक्षेचा अंतिम निकाल-एलिमेंटरी ग्रेड परीक्षा-अ श्रेणी-03, ब श्रेणी-14
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका जयश्री खंडाळकर,दीपिका जवळगेकर , वृषाली इंगळे आणि रविकांत सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे स्थानिय सचिव महेश चोप्रा,प्रशासक डॉ.विजयकुमार उबाळे आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा पाटील यांनी अभिनंदन केले.


























