वेळापूर – अशोक एकनाथ बनसोडे यांची जि.प. शाळा मुले वेळापूर व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्बल त्यांचा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतिने फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय साठे, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे , ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सरवदे, अमोल मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

























