नवीन नांदेड – श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी येथील ५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत गोपाळचावडी येथे १०८ महायज्ञास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी होमहवन पुजापाट करून जगद्गुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य यांचा आशीर्वाद घेतला.
श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी येथील ५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत गोपाळचावडी येथे १०८ आयोजित महायज्ञास दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राजाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी महायज्ञ होम हवन पूजा पाठ करून या जगत गुरु श्री भिमाशंकर शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद घेतला
विश्र्वशांती महायज्ञ आणि श्री केदारनाथ रावळ जगद्गुरू पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदरील धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने परमेश्वराचे साक्षात दर्शन परिसरातील भाविक भक्तगण घेत आहेत.
या महायज्ञाच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी येथे जमलेल्या संत महंतांचे दर्शन केले. त्यानंतर या परिसरात नटलेले केदारनाथ मंदिर, शिवमुर्ती व शिवलिंग अशा पवित्र परिसर नटलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी अमर राजूरकर, किशोर स्वामी, बालाजी पांडागळे यांची उपस्थिती होती.
























