सोलापूर : पत्रकारांनी समाजातील लोकभावना ओळखून त्या प्रभावीपणे मांडाव्यात. लोकशिक्षण आणि जनजागृतीचे अत्यंत सामर्थ्यशाली माध्यम म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडत जबाबदार पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी केले.
दैनिक तरुण भारतच्या सोलापूर कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी पत्रकारांचा सन्मान मुख्य संपादक प्रशांत माने आणि व्यवस्थापक विनायक पुला यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी वृत्त संपादक अजितकुमार संगवे, वरिष्ठ उपसंपादक श्रीनिवास गाजुल, शाम जोशी, आरती कुसेकर, अविनाश गायकवाड, उपसंपादक किरण बनसोडे, यशवंत गुरव, मकरंद ढोबळे, अभिषेक उघडे, आनंद ….. यांच्यासह अन्य पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
प्रशांत माने पुढे म्हणाले की, बदलत्या काळात पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. समाजहिताचे प्रश्न प्राधान्याने मांडून लोकशाही बळकट करण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून घडले पाहिजे. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी प्रामाणिक राहून पत्रकारांनी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. समारंभात पत्रकारांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

























