अक्कलकोट – लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजागृती रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार विनायक मगर गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड , श्रीमंत सारणे , निवडणूक पर्यवेक्षक बसवराज गुरव, खेमू राठोड , आवण्णा वंटे, गौरीशंकर पुजारी, विजय पुजारी, मेघदूत हेर्लेकर, विनायक जाधव, हनुमंत गायकवाड, निलेश घोडके, नजमा नदाफ, गोकुळ डाके, शंकर कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार विनायक मगर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले “भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारामध्ये आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार बनेल. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांनी लहान वयातच मतदानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
निवडणूक नायब तहसीलदार श्री विजयकुमार गायकवाड साहेब यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देताना नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, वगळणी तसेच मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या कामकाजावर प्रकाश टाकला. प्रत्येक पात्र नागरिकाने वेळेत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे व आवश्यक त्या सुधारणा करून घ्याव्यात, असे त्यांनी आवाहन केले.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “माझा मतदानाचा हक्क – माझी लोकशाहीची ताकद”, “एक मत – अनेक बदल”, “जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा” अशा घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि मतदानाबाबत सकारात्मक संदेश दिला. चौकट पुर्ण
या प्रसंगी निवडणूक पर्यवेक्षक
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “मी नक्की मतदान करीन” अशी शपथ घेत लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढीस लागली असून लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन बसवराज गुरव यांनी केले
आभार प्रदर्शन समीर मणियार यांनी केले

























