अक्कलकोट – तालुक्यातील नागणसूर येथील एच.जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील इंग्रजी विभाग प्रमुख बसवराज धनशेट्टी यांचे अक्कलकोट तालुका शिक्षक भारती संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने प्राचार्य शंकर व्हनमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेतील प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बसवराज धनशेट्टी हे उपक्रमशील शिक्षक असून गुणवत्ता वाढीसाठी व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत प्रयत्नशील असतात.अशा शिक्षकाचे तालुक्याच्या शिक्षक भारती संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील कार्यासाठी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,
























