बार्शी – महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे यांच्यातर्फ उत्तम दत्तात्रय पोतदार यांना निवृत्त सेवा पुरस्कार दि. ३ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र नर्सी नामदेव जिल्हा हिंगोली येथे सोलापूर जिल्हातून राज्य पातळीवरील सेवानिवृत्त पुरस्कार २०२४-२०२५ श्री. एन.डी. मारणे (अध्यक्ष महाराष्ट्र पेन्शनर असोशिऐशन पुणे ) यांच्या हस्ते सन्मानपत्र, ट्राॕफी देऊन गौरविण्यात आले.
उत्तम पोतदार यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्तीनंतरही पेन्शनर संघटनेच्या कामासाठी आयुष्याच्या उत्तरार्धाचा आलेख आदर्श ठेवला. सेवानिवृत्तांना प्रेरित करुन संघटनेस सभासद मिळवून देण्यासह संघटन मजबुतीचे कार्य सर्वार्थाने केले.
याबद्दल निवृत्त सेवा पुरस्कार मिळाला .पुरस्कार मिळाल्याबद्दल सुलाखे हायस्कूल वर्ग मित्रमंडळ तसेच सोलापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्यावतीने अभिनंदन केले आहे.
























