श्रीपूर – ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शना खाली शेतकऱ्यांनी शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्तम गुणवत्तेचा दर्जेदार ऊस पिक घेणाऱ्या सभासदांचा गौरव करून पुरस्कार देण्यात असल्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी जाहीर केले .
कारखाना कार्यस्थळावर कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . त्या प्रसंगी डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी हे जाहीर केले .
प्रथम कै . सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .
या प्रसंगी व्ही एस आय चे शास्त्रज्ञ डॉ . समाधान सुरवसे, डॉ . तुषार शितोळे , ए आय तज्ञ अजित वायसे , अरुण पडळ , महेश शिन्दे , कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी , संतोष कुमठेकर , ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेराव उपस्थित होते .
या प्रसंगी डॉ . समाधान शितोळे यांनी सद्य परिस्थितीत शेती मध्ये रासायनिक खते व मुबलक पाण्याच्या वापरामुळे शेतीची सुबकता कमी होऊन क्षारयुक्त शेती वाढत आहे . भविष्यात हा धोका मोठा असून शेती नापीक होण्याचा धोका आहे . यावर एआय तंत्रज्ञान प्रभावी माध्यम असून यात जमिनीना ज्यावेळी आवश्यक असणारे नत्र , पालाश स्फुरद याची माहिती मिळून त्याप्रमाणे स्वयंचलित प्रणाली व्दारे डोस देता येणार आहेत . याबरोबरच हवामानातील बदल , सेंद्रीय व रासायनिक खतांची मात्रा याचीही अद्ययावत माहिती मिळणार असल्याने कमी पाण्यात , कमी खर्चात ,कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन मिळणार असल्याची माहिती देवून शेतकऱ्यां साठी माहितीचे नवे दालन निर्माण होत असल्याचे सांगून काळाची गरज ओळखून सर्वांनी या तंत्रज्ञानाचा वापर करणेचे आवाहन केले .
याप्रसंगी डॉ . तुषार शितोळे , अजित वायसे , अरुण पडळ , महेश शिन्दे यांनीही एआय तंगज्ञानाचा वापर व त्याचे परिणाम यावर आपले विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे यांनी तर आभार ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी मानले .


























