बार्शी – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका ग्रामीण अध्यक्ष पदी भैरवनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली. ही निवड सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण नागणे याच्या हस्ते सत्कार, नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, तानाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता देव, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांच्यासह जिल्हा व बार्शी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























