घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या पायावर जोरदार हल्ला चढवित प्राणघातक हल्ला केल्याची घटना. तुमसर शहरातील दुर्गा नगरांत घडली.सिमा धनंजय उके (४५) व १७ वर्षीय मुलगी रा. दुर्गा नगर तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या माय-लेकीचे नाव आहे. विश्वास चंद्रिकापुरे (२५) रा.कुभांरे नगर तुमसर असे फरार आरोपी युवकाचे नाव आहे.
घरी आई व मुलगी घरी बसली असता़ना अचानक आरोपीने जखमींच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलींच्या पायावर चाकूने हल्ला चढविला असता आई व मुलीने घरा बाहेर पळ काढत आरडा ओरड केली. व लगतच्या घरी जात आपला जिव वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरीकांची गर्दी केली. जखमींना भंडारा येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा हल्ला करुन घटनास्थळावरुन पसार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.