भंडारा जिल्ह्याच्या देव्हाडी ग्रामपंचायत यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी 21 लाख रूपये खर्च करुण सोलर पॅनल बसविले पण ही योजना कुचकामी ठरली आहे. तुमसर तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणुन देव्हाडी ग्राम पंचायत ओळखली जाते. गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. पण याच पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी लाखो रूपये विद्युत बील येतं होता. यावर उपाय म्हणून ग्राम पंचायतीने दोन महिन्या पुर्वी 21 लाख रुपये खर्च करून सोलर पॅनल बसविले.
सोलर पॅनल वीज निर्मिती करत आहे की नाही याची खात्री न करत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी कंत्राटदाराला 21 लाख रूपये दिले. सोलर पॅनल बसवून सुद्धा लाखो रूपये विद्युत बिल ग्रामपंचायत भरत आहे. 21 लाख खर्च करून साधी 1 युनिट वीज निर्मिती होत नाही. नवीन सरपंच ग्रामपंचायत मध्ये बसताच हा सर्व प्रकार पुढे आला. या विषयी जिल्हा परिषदकडे तक्रार देण्यात आली. तर तात्कालिक सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाही व्हावी अशी मागणी देखिल केली आहे. तर या विषयी तत्कालीन सचिव गिरेपुंजे यांनी मोठी चूक झाल्याचे खासगीत कबुल केले. परंतु, अधिकृत वक्तव्य देण्यास नकार दिला.