भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन , कारधा पोलिस स्टेशन हद्दीत चार घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही पोलिस स्टेशन हद्दीत एकाच रात्री चार घरफोडी करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपासाची गती वाढविली आहे. यात पाच आरोपींना नागपुर येथून अटक करण्यात आली आहे. त्यात तीन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे. दिवसेंदिवस भंडारा जिल्हयातील घरफोडीच्या घटना वाढल्या आहे. एकीकडे जवाहरनगर, कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडी ताजी असताना पुन्हा भंडारा शहरात 10 दुकाने चोरट्यांनी फोडली. त्यामुळे पोलिसांचा धाकच उरला नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे. दोन घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक जरी केली पण भंडारा शहरातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...