सोलापूर- श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त श्री वीर तपस्वी शिक्षण संकुल एमआयडीसी येथे शिवरंजनी प्रस्तुत गाणे तुमची- आमची हा भाव- भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रथम बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव शांतया स्वामी व संचालक शशिकांत रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर सुहास सदाफुले, शशी बासुतकर ,उन्मेश शहाणे, समीर जैन, उमेश मोहोळकर, विश्वास शाईवाले, माधव देशपांडे, बिना बादरायणी आणि अपूर्वा शहाणे या कलाकारानी मराठी, हिंदी व कन्नड भाषेमधून एकापेक्षा एक सुरेख,सुंदर गाणी सादर करून उपास्थितांची वाहवा मिळवली.
गुरुकृपा साऊंडचे प्रथमेश सरवदे यांनी साऊंड सिस्टिमची चांगली व्यवस्था केली होती. या कार्यक्रमास बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.


















