जालना : जुना जालना भागातील शास्त्री गल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात या परिसरातील रहिवाशी असलेले येथील सर्व भूमिपुत्र जालना महानगर पालिकेतील निवडणूकीत विजयी झाले. अशा सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन सर्व शास्त्री गल्लीतील नागरिकांकडून करण्यात आले होते.
यावेळी खुशालसिंह राणा ठाकुर,नवनिर्वाचित नगरसेवक अशोक पांगारकर, श्रीकांत पांगारकर, किशोर पांगारकर,विजय पांगारकर, अमोल
ठाकुर, पंकज हुंबे उपस्थित होते. यावेळी रहिवाशी भरत मानकस, राजेंद्र गोरे, संजय ठाकुर, देशमुख काका,कक्कड,बैजल,सुमेर ठाकुर व शास्त्री
गल्लीतील सर्व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

























