सोलापूर लोकसभा निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी एका ठिकाणी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटे पर्यंत फेटा घालणार नाही हे वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेसने खरपूस समाचार घेत सातपुते यांनी केलेले वक्तव्य म्हणजे ते एक प्रकारे मान्य करतात की त्यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सध्या ही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे असे मत माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले.


















