नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील करून घेण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप राजकीय पक्ष आहे का? ती ढोंगी पार्टी आहे. ती एक टोळी आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी भाजपमध्ये होते, त्यावेळी भाजप पक्षात चांगली विचारधारा होती. आता विचारधारा राहिलेली नाहीये.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रविवारी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप ही ढोंगी पार्टी आहे. तो राजकीय पक्ष नसून टोळी आहे. राजकीय पक्ष असे वर्तन कधी करतात का? वाजपेयी-अडवाणींच्या काळात भाजप हा विचाराधारा जोपासणारा पक्ष होता. आज तो आज राहिलेला नाही. आम्ही त्यांना राजकीय पक्ष मानत नाही. ही मोदी-शाह यांची टोळी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांनी शिल्लक सेना अशी टीका केली होती. त्यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणताय पण तुम्ही २०२४ मध्ये शिल्लक राहता की नाही हा प्रश्न आहे.
भाजप ढोंगी पार्टी आहे, राजकीय पक्ष नसून टोळी आहे
नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील करून घेण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपने नवाब मलिक यांना विरोध केला आहे. यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप राजकीय पक्ष आहे का? ती ढोंगी पार्टी आहे. ती एक टोळी आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी भाजपमध्ये होते, त्यावेळी भाजप पक्षात चांगली विचारधारा होती. आता ती राजकीय पार्टी नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची टोळी आहे. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.