मोहोळ – भाजपा हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. केंद्रात मोदींचे आणि राज्यात देवा भाऊचे सरकार सर्वांच्या हितासाठी प्रयत्नशील आहे.अल्पसंख्यांकाने भाजपाला घाबरण्याची अजिबात गरज नाही उलट या डबल इंजिन सरकारचा फायदा करून घेऊन आपल्या शहराचा विकास साधावा आणि दरडोई उत्पन्न वाढवा यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन भारतीय जनता पार्टीत नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील (अनगरकर) यांनी केले.
मोहोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात इच्छुक उमेदवार व सर्व कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी राजन पाटील बोलत होते .यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा (पूर्व)चे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहोळ उत्तर मंडल अध्यक्ष सतीश काळे, मोहोळ दक्षिण मंडलअध्यक्ष रमेश माने,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते प्रकाश चवरे उपस्थित होते .
यावेळी बोलताना राजन पाटील यांनी राज्यातले सरकार आणि केंद्रातले सरकार करत असलेले देश हिताचे कार्य आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग याचा विस्तृत उल्लेख केला .एकंदरीत राजन पाटील यांच्या भाषणानंतर ते वीस पंचवीस वर्षांपूर्वीचे जुने कार्यकर्ते असल्याप्रमाणे त्यांचे भाषण झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली .तत्पूर्वी सोलापूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी संघटनेची माहिती आणि आगामी निवडणुका भाजपाला यश मिळण्याची गरज याची सविस्तर माहिती दिली .आभार मोहोळ उत्तर मंडल अध्यक्ष सतीश काळे यांनी मानले राष्ट्रगीता नंतर चहापानाने कार्यक्रमाचा समारोप झाला .

यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, माजी तालुका सरचिटणीस महेश सोवनी, प्रज्ञावंत आघाडीचे माजी जिल्हा सहसंयोजक अविनाश पांढरे,माजी सरपंच नानासाहेब फाटे, सुशील क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगरसेवक कुंदन धोत्रे, महेश सोवनी वैभवबापू गुंड सोमेश क्षीरसागर, हेमंत गरड, संतोष वायचळ, अरविंद माने, सौ. सारिका गायकवाड,सौ शुभांगी लंबे, सौ. यशोदा कांबळे, खाजाभाई शेख, इजाज तलफदार, शकील शेख, संतोष खंदारे,गौतम क्षीरसागर, सुदर्शन कादे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















