दक्षिण भागातील कामती बु. येथे अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय या सारख्या कार्यालयाची गेली अनेक वर्षापासून ची मागणी धुडकावून लावत ते इतर ठिकाणी मंजूर करायचे व त्याच्या उद्घाटनाला भाजपच्या महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,व जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यायचे ही बाब राजकीय दृष्ट्या गंभीर असून तालुक्याच्या दक्षिण भागातील उपेक्षित जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे होईल अशी खंत भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली.त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्धाटनाला भाजपाचे मंत्री व जिल्हाध्यक्ष येणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
येत्या 16 फेब्रुवारी रोजी अनगर ता मोहोळ येथे नव्याने मंजुर झालेले दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होत आहे त्या पाश्वभुमीवर भाजपाचे नेते संजय क्षीरसागर माहिती देत होते.क्षीरसागर म्हणाले,मोहोळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याचे ठिकाण हे दक्षिण भागातील शेवटचे गाव असलेल्या घोडेश्वर पासून जवळपास 40 किमी अंतरावर आहे.त्या भागातील कामती हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने त्या ठिकाणी पोलिस ठाणे ही निर्माण झालेले आहे.असे असताना त्या भागातील लोकांच्या मागणी प्रमाणे व सोई नुसार त्याच भागात अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर होणे गरजेचे असताना तशा आशयाचा मोहोळ तालुका भाजपाचा ठराव दिला असतानाही त्याला केराची टोपली दाखवत, ती मागणी धुडकावून लावली.