सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, सुनिता कामाठी आणि अंबिका चौगुले यांच्या प्रचारार्थ भव्य शक्तीप्रदर्शन रोडशो काढण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या रोडशोने संपूर्ण प्रभाग भाजपमय झाला होता. विशेषतः लाडक्या बहिणींचा मोठ्या संख्येने सहभाग हे या रोडशोचे आकर्षण ठरले.
विकास हाच आमचा अजेंडा या घोषणेसह भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उतरले असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले.
. प्रभाग १३ मधील चारही भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा भव्य रोडशो अशोक चौक, बोल्ली मंगलकार्यालय, साईबाबा चौक, मस्ताना हॉटेल, खड्डा तालीम, आम्रपाली चौक, वालचंद कॉलेज परिसर यासह प्रभागातील विविध भागांतून काढण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करून उमेदवारांचे स्वागत केले. महिलांच्या हातातील भगवे झेंडे, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या या भव्य शक्तीप्रदर्शनाने भाजपाच्या प्रचाराला निर्णायक उंची मिळाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य तसेच केंद्र सरकारच्या भरीव योजनांच्या आधारे भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी जनतेकडे मतदानरुपी आशीर्वाद मागितले. या विजय संकल्प रॅलीचे प्रभाग क्रमांक १३ मधील विविध नगरांमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शंकर चौगुले, गुर्रम, चिप्पा, आणि कामाठी समर्थकांसह भाजपा अधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.

























