सांगोला – पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवार दि.१२ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पं.स.सदस्य यांनी हात वरती करून अशी मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सर्वसाधारण महिला या आरक्षित सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून जवळा पं.स.सदस्य पुनम सुदर्शन इंगवले यांनी तर शेतकरी कामगार पक्षाकडून सोनंद पं.स.सदस्य काजल मुकेश काशीद यांनी अर्ज दाखल केला. यावेळी पुनम इंगवले यांना १४ पैकी ८ तर काजल काशीद यांना ६ मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी पुनम इंगवले यांना सभापतीपदी विजयी झाल्याचे जाहीर केले. तसेच उपसभापती पदासाठी शिवसेना (शिंदे गट) यांचेकडून चोपडी पं.स.सदस्य अजय उत्तम सरगर यांनी तर शेतकरी कामगार पक्षाकडून कोळा पं.स.सदस्य छाया सोपान कोळेकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी अजय सरगर यांना १४ पैकी ८ तर छाया कोळेकर यांना ६ मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी अजय सरगर यांना उपसभापतीपदी विजयी झाल्याचे जाहीर केले. यावेळी सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले, सहा.लेखा अधिकारी आनंद जाधव, पंचायत विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप देवकते, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजीत मोलाणी, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, पाणीपुरवठा अभियंता एस.आर.पुजारी, बांधकाम उपअभियंता अतुल लेंडवे, सहा.प्रशासन अधिकारी अजित देशमुख, कक्ष अधिकारी महेश जाधव, परमेश्वर नागने, आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत, सचिन घाडगे, विजय घेरडे, अभिजीत पवार, बाबुराव खटकाळे, निखील बाबर, सांगोला तहसील कार्यालयाचे समाधान वाघमोडे, अमोल देशमुख हे उपस्थित होते. सदर निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडली.



























