सोलापूर – राज्य अजिंक्यपद धनुर्विद्या स्पर्धेत तेरा वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात कंपाऊंड प्रकारात बुलढाणा जिल्ह्याने विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट संपादिला.
नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे. १३ वर्षाखालील गटात रिकर्व्ह प्रकारात सोलापूरच्या मुलांनी विजेतेपद पटकाविले. मुलीच्या गटात त्यांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. कंपाऊंड प्रकारात मुलांनी उपविजेतेपद व मुलीनी तृतीय स्थान संपादिले.
शनिवारी झालेले अंतिम निकाल (प्रथम तीन )
कंपाऊंड : सांघिक : मुले : बुलढाणा, सोलापूर, परभणी. मुली : बुलढाणा, पिंपरी चिंचवड, सोलापूर.
वैयक्तिक : मुले : देवांश शेवाळे (३५५, बुलढाणा), आदर्श साळवे (३५४, जालना ), शंभूराज नरवडे (३५१, परभणी). मुली : भार्गवी पवार (३५० पिंपरी चिंचवड ), सिद्धी राठोड (३४६, बुलढाणा ), आरोही जाधव (३४५, नांदेड ).
रिकर्व्ह : सांघिक : मुले :सोलापूर, सातारा, पुणे. मुली : पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर.
वैयक्तिक : मुले : राज लोकरे, अथर्व नरोटे(३४७), योगराज शिंदे (३४६, तिघे सोलापूर). मुली : धनश्री शिरसाट (३४५, अहिल्यानगर ), आरुषी कदम (३४५, नांदेड ), मार्गी पाटील ( ३४२, अमरावती).


























